लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात एक दिवसीय चर्चासत्र

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात एक दिवसीय चर्चासत्र

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि इंग्रजी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अणा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची सांस्कृतिक भूमिका’ या विषयावरील विशेष एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.  सोमवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या गणित अधिविभाग सभागृहात चर्चासत्र होईल.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई येथील डॉ. बळीराम गायकवाड यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस मुख्य बीजभाषक म्हणून आपले विचार मांडतील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यानंतरच्या चर्चासत्रात डॉ. मेघा पानसरे, डॉ. आलोक जत्राटकर आणि डॉ. अंबादास सकट हे सहभागी होतील. या सत्राच्या अध्यक्षपदी डॉ. गिरीष मोरे असतील. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अध्यासनाचे समन्वयक डॉ. अक्षय सरवदे आणि इंग्रजी अधिविभागप्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*