सातारा : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठातर्फे मोडी लिपी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ग दिनांक १५ ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व इतिहास अभ्यासकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.
कला व वाणिज्य महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे दुर्मिळ मोडी लिपीचे संवर्धन होण्यासाठी मोडी लिपी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. या अभ्यासक्रमास वर्षात विद्यार्थी, अभ्यासक व संशोधक प्राध्यापकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मध्ययुगीन महाराष्ट्राची राजलिपी असलेली मोडी लिपी गेल्या अनेक वर्षात अस्तंगत होत गेली आहे. या लिपीतच महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास दडला असून आज मोडी लिपीचे वाचक नसल्याने या इतिहासावर प्रकाश टाकणारे अभ्यासक कमी उपलब्ध आहेत. त्यामुळेच या लिपीचे संवर्धन होण्यासाठी कला व वाणिज्य महाविद्यालयात हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमास मर्यादित प्रवेश अभ्यासक्रमाचे वर्ग १५ ऑक्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहेत. अभ्यासक्रमास प्रवेश संख्या मर्यादीत आहे. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांना मोडी लिपी लेखन, वाचन यासह शिवकालीन व पेशवेकालीन अस्सल दुर्मिळ कागदपत्रांची माहिती मोडी अभ्यासक देणार आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रा. गौतम काटकर (मो. नं. ९८८१५५०७०६), इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. सातपुते (मोबा. ९८८१०३३०९८) व महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी केले आहे.


Leave a Reply