MAHA TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र  जाहीर

MAHA TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र  जाहीर झाले आहे आणि परीक्षा २८ जून २०२६ रोजी होणार आहे.  नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी परीक्षा २१ जून रोजी घेण्याचं जाहीर केल्याने टीईटी परीक्षा तारीख बदलण्यात आली.

तुम्ही अधिकृत वेबसाईट mahatet.in वर जाऊन तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.

महत्त्वाच्या तारखा आणि वेळ
परीक्षा दिनांक: २८ जून २०२६ (रविवार)
पेपर १ (इयत्ता १ ली ते ५ वी): सकाळी १०:३० ते दुपारी १:००
पेपर २ (इयत्ता ६ वी ते ८ वी): दुपारी २:३० ते संध्याकाळी ५:००

हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे?
MAHA TET या वेबसाइटवर जाऊन Admit Card Finder या अधिकृत लिंकला भेट द्या. यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि अर्ज क्रमांक नोंदवा.सबमिट वर क्लिक करून तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.

परीक्षा पद्धती
पेपर १ (Paper I) :१५० गुण (१५० प्रश्न)
पेपर २ (Paper II):१५० गुण (१५० प्रश्न)

पात्रता गुण (Passing)
ओपन: ९० (६०%), राखीव: ८२ (५५%)
ओपन: ९० (६०%), राखीव: ८२ (५५%)

परीक्षा केंद्रावर जाताना कोणती कागदपत्रे सोबत न्यावीत?
महाटीईटी हॉल तिकीटची प्रिंट काढलेली प्रत.

मूळ ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स).

काळा/निळा बॉलपेन आणि पाण्याचे बॉटल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*