MSC BANK Recruitment: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती; ऑफलाइन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई:बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. (MSC BANK), मुंबई यांच्यामार्फत ‘माहिती व तंत्रज्ञान’ (IT) आणि ‘ट्रेझरी’ (Treasury) विभागातील विविध पदांसाठी अनुभवी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे:
१. व्यवस्थापक: ०१ माहिती व तंत्रज्ञान
२. सहाय्यक व्यवस्थापक : ०४ माहिती व तंत्रज्ञान
३. द्वितीय श्रेणी अधिकारी : ०५ माहिती व तंत्रज्ञान
४. ज्युनिअर श्रेणी अधिकारी: १६ माहिती व तंत्रज्ञान
५. द्वितीय श्रेणी अधिकारी: ०३ ट्रेझरी
६.ज्युनिअर श्रेणी अधिकारी: ०४ ट्रेझरी
महत्त्वाच्या बाबी आणि तारखा:
अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख:दि. ०८ जुलै २०२६ पर्यंत.
अधिकृत संकेतस्थळ:भरती संदर्भातील इतर विस्तृत माहिती आणि अर्जाचा विहित नमुना बँकेच्या https://msc.bank.in/career या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन बँकेतर्फे करण्या
त आले आहे.


Leave a Reply