मुंबई, दि. 19 नोव्हेंबर : आरोग्यसेवा क्षेत्रात केवळ उत्तम वैद्यकीय उपचार देणे पुरेसे नसून, रुग्ण आणि आरोग्यसेवा व्यावसायिक यांच्यात विश्वासाचे व आपुलकीचे नाते निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने एक्झिक्युटिव्ह कोचिंग क्षेत्रातील ओरिएल अकॅडमी (Oriel Academy) यांच्या वतीने मुंबईतील आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी ‘बॉन्डिंग!’ या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही एकदिवसीय कार्यशाळा २१ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथे होणार आहे.
रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्या, तरी रुग्णांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रभावी संवाद, सहानुभूतीपूर्ण वर्तन, रुग्णांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवेदनशीलतेने संवाद साधणे आवश्यक असते. या बाबींचे महत्त्व लक्षात घेऊन ओरिएल अकॅडमीने ‘बॉन्डिंग!’ हा रुग्ण संबंध व्यवस्थापन (Patient Relationship Management) विषयावरील प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे.
या कार्यशाळेमध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णसेवा कर्मचारी, निदान केंद्रांमधील कर्मचारी, नर्सिंग होम्स तसेच खासगी दवाखान्यांतील आरोग्यसेवा व्यावसायिकांना प्रभावी संवादकौशल्ये, आंतरवैयक्तिक संबंध, व्यावसायिक आचरण आणि सॉफ्ट स्किल्स यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रुग्णांच्या तक्रारी प्रभावीपणे हाताळणे, कठीण परिस्थितीत योग्य संवाद साधणे आणि रुग्णांचा रुग्णालयातील अनुभव अधिक सकारात्मक बनविणे यावर या प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे.
ओरिएल अकॅडमीचे संचालक खालिद जमाल यांनी सांगितले की, आरोग्यसेवा क्षेत्रात कार्यक्षमता वाढविण्यासोबतच सहानुभूतीपूर्ण आणि रुग्णकेंद्रित सेवा विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रभावी संवादकौशल्ये आणि सकारात्मक वर्तणुकीमुळे आरोग्यसेवा व्यावसायिकांना विविध आव्हानांचा सामना करता येतो. तसेच रुग्ण आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे व समाधानकारक संबंध निर्माण होण्यास मदत होते.
आरोग्यसेवेचा दर्जा उंचावणे, रुग्णांचा अनुभव अधिक सुखकर करणे, तक्रारींचे प्रमाण कमी करणे आणि आरोग्यसेवा संस्थांमध्ये सकारात्मक व व्यावसायिक कार्यसंस्कृती विकसित करणे ही या कार्यशाळेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
नोंदणी व अधिक माहितीसाठी : अधिक माहितीसाठी “www.orielacademy.com” या वेबसाईटला भेट द्यावी.


Leave a Reply