इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू

इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू

 

पुणे: भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ साठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.

 

या स्पर्धेत जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून, राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट स्पर्धकांना World Skills स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी विविध कौशल्य क्षेत्रांनुसार निर्धारित वयोमर्यादा लागू राहणार आहे.

 

शासकीय व खासगी आयटीआय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, एमएसएमई, कौशल्य प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी.

 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*