SBI PO Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती,1500 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

SBI PO Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती,1500 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदासाठी 2026- 270या वर्षातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी ची नोंदणी प्रक्रिया चालू झाले असून एकूण 1500 जागांसाठी ही भरती प्रक्रिया चालू आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 18 जून ते 8 जुलै इतकी आहे.

SBI PO Recruitment 2026: प्रोबेशनरी ऑफिसर पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती देशभरात कोठेही केली जाईल. परीक्षेच्या नोटिफिकेशन नुसार ही प्रक्रिया तीन टप्प्यात राबवली जाणार आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा सायको मॅट्रिक टेस्ट ग्रुप एक्सरसाइज आणि मुलाखत हे परीक्षेचे टप्पे असतील. कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करिअर पोर्टल वरून अर्ज दाखल करू शकतात.

प्रोबेशनरी ऑफिसर पदभरती संभाव्य वेळापत्रक:
अर्ज दाखल करणे :18 जून ते 8 जुलै
पूर्व परीक्षा प्रवेश पत्र: जुलै च्या तिसऱ्या आठवड्यात
पूर्व परीक्षा :ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा निकाल: ऑगस्ट सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2026
मुलाखत : ऑक्टोबर नोव्हेंबर 2026
अंतिम निकाल: नोव्हेंबर डिसेंबर 2026

प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज कसा करायचा?
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या sbi.bank.in.वेबसाईटला भेट द्या.
SBI PO Recruitment 2026 अर्ज लिंक ओपन करा, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्वारे नोंदणी करून अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि सही अपलोड करा.
अर्जाची फी ऑनलाईन भरुन अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

SBI PO Recruitment 2026:  पात्रता आणि जागा
अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केली असावी. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. ही भरती 1500 जागांसाठी असून 21 ते 30 वय असणारे उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा शिथील असेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*