नवी दिल्ली: कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने जनरल ड्यूटी कॉन्स्टेबल या पदाच्या 25487 जागांच्या भरती साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. 1 डिसेंबर पासून एसएससी जनरल ड्यूटी या पदाच्या सेंट्रल सिक्युरिटी पोलीस फोर्स आणि आसाम रायफल्स मधील भरतीसाठी अर्ज दाखल करता येईल.
कोणत्या सुरक्षा दलात भरती?
सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स (AR) आणि सचिवालय सुरक्षा दल (SSF) यांसारख्या विविध निमलष्करी दलांमध्ये (CAPFs) कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमन (जनरल ड्युटी) पदांचा समावेश या भरतीत करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज भरण्यास सुरूवात: 1 डिसेंबर 2025
अर्ज करण्याची अंतिम मुदत: 31 डिसेंबर 2025
ऑनलाइन परीक्षा (कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा) तारीख: फेब्रुवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान ( अंदाजित) होईल. ही परीक्षा मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषेत होईल.
पात्रता :
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा: 1 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील (SC/ST/OBC) उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
अर्ज प्रक्रिया:
स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वन टाइम ओटीपीसह नोंदणी करणे आवश्यक आहे आणि नंतर ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे व फी जमा करायची आहे.
फी किती?
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये परीक्षा शुल्क असेल. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्कात सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया: कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, शारीरिक क्षमता चाचणी, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, मेडिकल टेस्ट, कागदपत्र पडताळणी या टप्प्यात होईल.
अधिक माहिती आणि अचूक तपशीलांसाठी, उमेदवारांनी SSC च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी.



Leave a Reply