Kumathe ZP Gat Election : कुमठे जिल्हा परिषद गट, कुमठे पंचायत समिती गण, ल्हासुर्णे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या 

Kumathe ZP Gat Election : कुमठे जिल्हा परिषद गट, कुमठे पंचायत समिती गण, ल्हासुर्णे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 12 गण आहेत. यामध्ये पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गट, वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट, सातारारोड जिल्हा परिषद गट, कुमठे जिल्हा परिषद गट, एकंबे जिल्हा परिषद गट, वाठार किरोली जिल्हा परिषद गट हे सहा जिल्हा परिषद गट कोरेगाव तालुक्यात आहेत.

कुमठे हा राजकीय दृष्ट्या कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात कुमठे गण आणि ल्हासुर्णे गणांचा समावेश होतो. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.

कोरेगाव तालुक्यातील कुमठे जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग सर्वसाधारण आहे. कुमठे जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 27 आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 38845 आहे. तर, कुमठे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 20097 इतकी आहे. ल्हासुर्णे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18748 इतकी आहे.

कुमठे जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण

कोरेगाव पंचायत समिती सभापती प्रवर्ग : ओबीसी महिला

कुमठे (53) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)

कुमठे पंचायत समिती गणातील गावे

तडवळे संमत कोरेगाव, कुमठे, भोसे, सांगवी, चिमणगांव, आसरे, वडाचीवाडी, बोधेवाडी (चि), भंडारमाची, रामोशीवाडी, भाटमवाडी,

ल्हासुर्णे (54) गणातील गावं (ओबीसी महिला)

ल्हासुर्णे पंचायत समिती गणातील गावे

आसगांव, चांदवडी, बोबडेवाडी, भाकरवाडी, जळगाव, जांब बु. ल्हासुर्णे, भिवडी, त्रिपुटी, मुगांव, जरेवाडी, शिरढोण, मंगळापूर, तांदूळवाडी,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*