Mayani ZP Gat Election Mayani Panchayat Samiti Gan Kaledhon Panchayat Samit Gan : मायणी जिल्हा परिषद गट, मायणी पंचायत समिती गण, कलेढोण पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
Mayani ZP Gat Election Mayani Panchayat Samiti Gan Kaledhon Panchayat Samit Gan Khatav Panchayat Samiti Election Satara ZP
Election
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत.
खटाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 14 गण आहेत. यामध्ये बुध गट, खटाव जिल्हा परिषद गट, कातरखटाव जिल्हा परिषद गट, निमसोड जिल्हा परिषद गट, औंध जिल्हा परिषद गट, पुसेसावळी जिल्हा परिषद गट, मायणी हे सात जिल्हा परिषद खटाव तालुक्यात आहेत. मायणी हा राजकीय दृष्ट्या खटाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात मायणी गण आणि कलेढोण गणांचा समावेश
होतो.
मायणी जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 23 आहे. मायणी जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 35286 आहे. तर,मायणी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17223 इतकी आहे. कलेढोण पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18063 इतकी आहे.
मायणी जिल्हा परिषद गट आरक्षण : ओबीसी
पंचायत समिती सभापती प्रवर्ग : अनु. जाती महिला
मायणी (45) गणातील गावं (ओबीसी महिला )
मायणी, चितळी, शेडगेवाडी, नित्रळ पुर्न.
कलेढोण (46) गणातील गावं (सर्वसाधारण)
अनफळे, कानकात्रे, ढोकळवाडी, हिवरवाडी, विखळे, पाचवड, गारुडी, मुळीकवाडी, तरसवाडी, गारळेवाडी, कलेढोण



Leave a Reply