Aundh ZP Gat Election: औंध जिल्हा परिषद गट, सिद्धेश्वर कुरोली पंचायत समिती गण, औंध पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Aundh ZP Gat Election Sidheshwar Kuroli Panchayat Samiti Gan Aundh Panchayat Samit Gan : औंध जिल्हा परिषद गट, सिद्धेश्वर कुरोली
पंचायत समिती गण, औंध पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत.

खटाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 14 गण आहेत. यामध्ये बुध गट, खटाव जिल्हा परिषद गट, कातरखटाव जिल्हा परिषद गट, निमसोड जिल्हा परिषद गट, औंध  जिल्हा परिषद गट, पुसेसावळी जिल्हा परिषद गट, मायणी  हे  सात जिल्हा परिषद खटाव तालुक्यात आहेत.

खटाव तालुक्यातील औंध हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा गट आहे. या गटात सिद्धेश्वर कुरोली गण आणि औंध गणांचा समावेश होतो.  औंध जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा प्रवर्ग देखील ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यानं या गटाचं महत्त्व वाढलं आहे.

औंध जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 21 आहे. औंध जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 33929 आहे. तर, सिद्धेश्वर कुरोली पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 16861 इतकी आहे. औंध पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17068 इतकी आहे.

औंध जिल्हा परिषद गट आरक्षण : ओबीसी महिला

पंचायत समिती सभापती प्रवर्ग : अनु. जाती महिला

सिद्धेश्वर कुरोली (41) गणातील गावं (सर्वसाधारण  )
अंभेरी, कोकराळे, भोसरे, वडखळ, धकटवाडी, लोणी, सिध्देश्वर कुरोली, भुरकवडी, वाकेश्वर

औंध (42) गणातील गावं  (सर्वसाधारण)
जायगाव, वरुड, खबालवाडी, औध, गणेशवाडी (औंध), नांदोशी, त्रिमली, लांडेवाडी, करांडेवाडी, येळीव, खरशिंगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*