Nimsod ZP Gat Election Nimsod Panchayat Samiti Gan Gursale Panchayat Samit Gan : निमसोड जिल्हा परिषद गट, निमसोड पंचायत समिती गण,गुरसाळे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत.
खटाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 14 गण आहेत. यामध्ये बुध गट, खटाव जिल्हा परिषद गट, कातरखटाव जिल्हा परिषद गट, निमसोड जिल्हा परिषद गट, औंध जिल्हा परिषद गट, पुसेसावळी जिल्हा परिषद गट, मायणी हे सात जिल्हा परिषद खटाव तालुक्यात आहेत. निमसोड हा राजकीय दृष्ट्या खटाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात निमसोड गण आणि गुरसाळे गणांचा समावेश
होतो.
निमसोड जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 20आहे. निमसोड जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 37724 आहे. तर,निमसोड पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 19938 इतकी आहे. गुरसाळे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17786 इतकी आहे.
निमसोड जिल्हा परिषद गट आरक्षण : ओबीसी
पंचायत समिती सभापती प्रवर्ग : अनु. जाती महिला
निमसोड (39) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)
अंबवडे, पिंपरी, गोरेगाव (नि), धोंडेवाडी, मरडवाक, मोराळे, गुंडेवाडी, पोपळकरवाडी, निमसोड
गुरसाळे (40) गणातील गावं (ओबीसी)
गोसाव्याचीवाडी, कुमठे, नायकाचीवाडी, उबंर्डे, नढवळ (काळेवाडी), गुरसाळे, दहिवडी (पुर्न), गोपूज, पळशी, वाकळवाडी, शिरसवडी



Leave a Reply