Katar Khatav ZP Gat Election : कातर खटाव जिल्हा परिषद गट, दरुज पंचायत समिती गण, कातर खटाव पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Katar Khatav ZP Gat Election Daruj Panchayat Samiti Gan Katar Khatav Panchayat Samit Gan : कातर खटाव जिल्हा परिषद गट, दरुज पंचायत समिती गण, कातर खटाव पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. खटाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 14 गण आहेत. यामध्ये बुध गट, खटाव जिल्हा परिषद गट, कातरखटाव जिल्हा परिषद गट, निमसोड जिल्हा परिषद गट, औंध जिल्हा परिषद गट, पुसेसावळी जिल्हा परिषद गट, मायणी हे सात जिल्हा परिषद खटाव तालुक्यात आहेत.

कातर खटाव हा राजकीय दृष्ट्या खटाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात दरुज गण आणि कातर खटाव गणांचा समावेश होतो. कातर खटाव जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 19 आहे. कातर खटाव जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 37256 आहे. तर, दरुज पंचायत समिती गणाची
मतदारसंख्या 18025 इतकी आहे. कातर खटाव पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 19230 इतकी आहे.

कातर खटाव जिल्हा परिषद गट आरक्षण :सर्वसाधारण

पंचायत समिती सभापती प्रवर्ग : अनु. जाती महिला

दरुज (37) गणातील गावं (सर्वसाधारण)
दरुज, सुंदरपूर, पेडगाव, मांडवे, तडवळे, सातेवाडी, हिंगणे, बोंबाळे, डांभेवाडी, दाळमोडी, गणेशवाडी (वडूज)

कातर खटाव (36) गणातील गावं (अनुसूचित जाती महिला )
कातरखटाव, येरळवाडी, यलमरवाडी, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, कान्हरवाडी, पडळ, दातेवाडी, सूर्याचीवाडी, बनपूरी, पळसगाव, माने तुपेवाडी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*