Budh ZP Gat Election Diskal Panchayat Samiti Gan Budh Panchayat Samit Gan :बुध जिल्हा परिषद गट, डिस्कळ पंचायत समिती गण, बुध पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Budh ZP Gat Election Diskal Panchayat Samiti Gan Budh Panchayat Samit Gan :बुध जिल्हा परिषद गट, डिस्कळ पंचायत समिती गण, बुध पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. खटाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 14 गण आहेत. यामध्ये बुध गट, खटाव जिल्हा परिषद गट, कातरखटाव जिल्हा परिषद गट, निमसोड जिल्हा परिषद गट, औंध जिल्हा परिषद गट, पुसेसावळी जिल्हा परिषद गट, मायणी हे सात जिल्हा परिषद खटाव तालुक्यात आहेत.

खटाव तालुक्यातील बुध हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा गट आहे. या गटात डिस्कळ गण आणि बुध गणांचा समावेश होतो. बुध जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा प्रवर्ग देखील ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यानं या गटाचं महत्त्व वाढलं आहे.

बुध जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 17 आहे. बुध जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 38268 आहे. तर, डिस्कळ पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18073 इतकी आहे. बुध पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 20195 इतकी आहे.

बुध जिल्हा परिषद गट आरक्षण : ओबीसी महिला

पंचायत समिती सभापती प्रवर्ग : अनु. जाती महिला

डिस्कळ (33) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)

डिस्कळ, माजेरवाडी, मोळ, चिंचणी, काळेवाजी, पांढरवाडी, अनपटवाडी, गारवडी, शिंदेवाडी, नवलेवाडी, ललगुण, नागनाथ वाडी, पांगरखेल, राजापूर.

बुध (34) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)

बुध, काटेवाडी, फडतरवाडी बुद्रुक, पवारवाडी, वर्धनगड नेर, फडतरवाडी नेर, विसापूर, वेटणे, रणशिंगवाडी, कातळगेवाडी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*