Mardi ZP Gat Election Mardi Panchayat Samiti Gan Varkute Mhaswad Panchayat Samit Gan : मार्डी जिल्हा परिषद गट, मार्डी पंचायत समिती गण, वरकुटे म्हसवड पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. माण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 10 गण आहेत. यामध्ये आंधळी गट, बिदाल जिल्हा परिषद गट, मार्डी जिल्हा परिषद गट, गोंदवले बु. जिल्हा परिषद गट, कुकुडवाड जिल्हा परिषद गट हे पाच जिल्हा परिषद माण तालुक्यात आहेत. मार्डी हा राजकीय दृष्ट्या माण तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात मार्डी गण आणि वरकुटे म्हसवड गणांचा समावेश होतो.
मार्डी जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 13
आहे. मार्डी जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 36743 आहे. तर, मार्डी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18995 इतकी आहे. वरकुटे म्हसवड पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17748 इतकी आहे.
मार्डी जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण महिला
पंचायत समिती सभापती प्रवर्ग : सर्वसाधारण
मार्डी (27) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)
मार्डी, रांजणी, इंजबाव, भालवडी रानंद, शेवरी, सोकासन
वरकुटे म्हसवड (28) गणातील गावं (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
वरकुटे म्हसवड, भालवाडी, पर्यंती, खडकी, भाटकी, हवालदारवाडी, कारखेल, धुळदेव, हिंगणी, शंभूखेड



Leave a Reply