Andhali ZP Gat Election Malavadi Panchayat Samiti Gan Andhali Panchayat Samit Gan : आंधळी जिल्हा परिषद गट, मलवडी पंचायत समिती गण, आंधळी पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. माण तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 10 गण आहेत. यामध्ये आंधळी गट, बिदाल जिल्हा परिषद गट, मार्डी जिल्हा परिषद गट, गोंदवले बु. जिल्हा परिषद गट, कुकुडवाड जिल्हा परिषद गट हे पाच जिल्हा परिषद माण तालुक्यात आहेत. आंधळी हा राजकीय दृष्ट्या माण तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात मलवडी गण आणि आंधळी गणांचा समावेश होतो.
आंधळी जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 12 आहे. आंधळी जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 36495 आहे. तर, मलवडी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18560 इतकी आहे. आंधळी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 17935 इतकी आहे.
आंधळी जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण महिला
पंचायत समिती सभापती प्रवर्ग : सर्वसाधारण
मलवडी (23) गणातील गावं (सर्वसाधारण)
मलवडी, वारुगड, श्रीपालवन, भांडवली, कुळकजाई, खोकडे गाडेवाडी, कळस्करवाडी, बोथे शिरवली, सत्रेवाडी, टाकेवाडी, तोंडले
आंधळी (24) गणातील गावं (सर्वसाधारण)
आंधळी, महिमानगड, उकिरडे, पांढरवाडी, कोळेवाडी, दिवडी, सिंधी बुद्रुक, बोडके, पिंगळी खुर्द, पिंगळी बुद्रुक, कासारवाडी



Leave a Reply