Malhar Peth ZP Gat Election :मल्हार पेठ जिल्हा परिषद गट, मल्हार पेठ पंचायत समिती गण, नाडे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Malhar Peth ZP Gat Election Malhar Peth Panchayat Samiti Gan Nade Panchayat Samit Gan : मल्हार पेठ जिल्हा परिषद गट, मल्हार पेठ पंचायत समिती गण, नाडे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. पाटण तालुक्यातील मल्हार पेठ जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्याने मल्हार पेठ जिल्हा परिषद गटाचे राजकीय महत्त्व वाढले आहे.

मल्हार पेठ जिल्हा परिषद गट पाटण पंचायत समितीच्या मल्हार पेठ आणि नाडे या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. मल्हार पेठ जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 42078 इतके आहे. या गटाचा अनुक्रमांक 50 इतका आहे.

पाटण तालुक्यातील मल्हार पेठ पंचायत समिती गण हा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 21888 इतके आहे. तर, नाडे पंचायत समिती गण हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 20190 इतके आहे.

मल्हार पेठ जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातील पंचायत समिती गण आणि गावं:
मल्हारपेठ जि.प. : ओबीसी महिला
मल्हारपेठ: मल्हारपेठ, निसरे, नावडी, उरूल (सर्वसाधारण महिला)
नाडे : नाडे, आडूळ, मुळगाव, चोपडी (ओबीसी)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*