Wing ZP Gat Election Kole Panchayat Samiti Gan Wing Panchayat Samit Gan : विंग जिल्हा परिषद गट, कोळे पंचायत समिती गण, विंग पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Wing ZP Gat Election Kole Panchayat Samiti Gan Wing Panchayat Samit Gan : विंग जिल्हा परिषद गट, कोळे पंचायत समिती गण, विंग पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. कराड तालुक्यातील विंग जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे या जिल्हा परिषद गटाचे राजकीय महत्त्व वाढले आहे.

विंग जिल्हा परिषद गट कराड पंचायत समितीच्या कोळे आणि विंग या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. विंग जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 34863 इतके आहे. या गटाचा अनुक्रमांक 61 इतका आहे.

कराड तालुक्यातील कोळे पंचायत समिती गण हा खुला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 17304 इतके आहे. तर, विंग पंचायत समिती गण हा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 17579 इतके आहे.

विंग जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातील पंचायत समिती गण आणि गावं:

कोळे :सर्वसाधारण
कोळे, बामणवाडी, तारूख, कुसूर, कोळेवाडी, शिंगणवाडी, आणे, वानरवाडी, अंबवडे

विंग : सर्वसाधारण महिला
विंग, शिंदेवाडी, पोतले, घारेवाडी, नवीन घारेवाडी, येरवळे, येणके,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*