Varunji ZP Gat Election Varunji Panchayat Samiti Gan Koyna Vasahat Panchayat Samit Gan : वारुंजी जिल्हा परिषद गट, वारुंजी पंचायत समिती गण, कोयना वसाहत पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. कराड तालुक्यातील वारुंजी जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
वारुंजी जिल्हा परिषद गट कराड पंचायत समितीच्या वारुंजी आणि कोयना वसाहत या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. वारुंजी जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 41587 इतके आहे. या गटाचा अनुक्रमांक 59 इतका आहे.
कराड तालुक्यातील वारुंजी पंचायत समिती गण हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 21587 इतके आहे. तर, कोयना वसाहत पंचायत समिती गण हा खुला प्रवर्गासाठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 20020 इतके आहे.
वारुंजी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातील पंचायत समिती गण आणि गावं:
वारुंजी:अनुसूचित जाती
वारुंजी, गोटे, खोडशी, मुंढे, वनवासमाची (खो)
कोयना वसाहत : सर्वसाधारण
कोयना वसाहत, जखीणवाडी, नांदलापूर, धोंडेवाडी, मुनावळे, कालेटेक, चचेगाव, चौगुले मळा
Varunji ZP Gat Election Varunji Panchayat Samiti Gan Koyna Vasahat Panchayat Samit Gan Karad Panchayat Samiti Election Satara ZP Election



Leave a Reply