Umbraj ZP Gat Election Umbraj Panchayat Samiti Gan Talbid Panchayat Samit Gan : उंब्रज जिल्हा परिषद गट, उंब्रज पंचायत समिती गण, तळबीड पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत. साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळून 130 गण आहेत. कराड तालुक्यातील उंब्रज जिल्हा परिषद गट राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.
उंब्रज जिल्हा परिषद गट कराड पंचायत समितीच्या उंब्रज आणि तळबीड या दोन गणांचा मिळून बनलेला आहे. उंब्रज जिल्हा परिषद गटाचे एकूण मतदान 44211 इतके आहे.या गटाचा अनुक्रमांक 55 इतका आहे.
कराड तालुक्यातील उंब्रज पंचायत समिती गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या गणाचे मतदान 23449 इतके आहे. यात एकट्या उंब्रजचे मतदान 16854 इतके आहे. तर, तळबीड पंचायत समिती गण हा सर्वसाधारण साठी राखीव आहे. याचे एकूण मतदान 20762 इतके आहे.
सातारा जिल्हा परिषदेचा उंब्रज जिल्हा परिषद गट सर्वसाधारण साठी राखीव आहे. यामुळे या गटात इच्छुकांची संख्या अधिक आहे.
उंब्रज आणि तळबीड पंचायत समिती गणातील गावांची नावे
उंब्रज (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
उंब्रज, गोडवाडी, अंधारवाडी, कोट, भोसलेवाडी
तळबीड (सर्वसाधारण)
तळबीड, बेलवडे ह., तासवडे, वराडे, शिवडे, हनुमानवाडी, वहागाव, घोणशी, भवानवाडी, कळंत्रेवाडी, मांगवाडी, नानेगाव बुद्रुक
Umbraj ZP Gat Election Umbraj Panchayat Samiti Gan Talbid Panchayat Samit Gan



Leave a Reply