Kudal  ZP Gat Election : कुडाळ जिल्हा परिषद गट, कुडाळ पंचायत समिती गण, सायगांव पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

Kudal  ZP Gat Election : कुडाळ जिल्हा परिषद गट, कुडाळ पंचायत समिती गण, सायगांव पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या

सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना  जाहीर करण्यात आली आहे.  सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.

साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. जावली तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 6 गण आहेत.  म्हसवे जिल्हा परिषद गट, कुडाळ जिल्हा परिषद गट, कुसुंबी जिल्हा परिषद गट  हे  तीन जिल्हा परिषद गट जावली तालुक्यात आहेत.

कुडाळ हा राजकीय दृष्ट्या जावली तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात खर्शी बारामुरे गण आणि म्हसवे गणांचा समावेश होतो.  हा जिल्हा परिषद गट ओबीसी महिला  प्रवर्गासाठी राखीव आहे. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या गटाचं राजकीय महत्त्व वाढले आहे.

जावली तालुक्यातील कुडाळ जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग ओबीसी महिला आहे. कुडाळ जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 37 आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 35411 आहे. तर, कुडाळ पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 16189 इतकी आहे. सायगांव पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 19222 इतकी आहे.

कुडाळ जिल्हा परिषद गट आरक्षण : ओबीसी महिला

जावली पंचायत समिती निवडणूक

कुडाळ पंचायत समिती गणातील गावे (सर्वसाधारण)

कुडाळ, सरजापूर, सरताळे, आर्डे, सोनगाव, बेलवडे मरडमुरा, पानस. पु. , सांगवी तर्फ कुडाळ, बामणोली तर्फे कुडाळ, भिवडी,

सायगांव पंचायत समिती गणातील गावे ( सर्वसाधारण महिला)

जवळवाडी, आगलावेवाडी, बिभवी, रिटकवली, ओझरे, भणंग, कुंभारगणी, केसकरवाडी, वाघेश्वर, केंजळ, मोरावळे, नरफदेव, मोरघर, धनगरपेठा, महिंगाव, प्रभुचीवाडी, दुदुस्करवाडी, दरे खु. , जवळेवाडी, मोरेवाडी, पवारवाडी, सायगाव, खर्शी तर्फ कुडाळ, रायगांव, महामुलकरवाडी, अनेवाडी,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*