अंधश्रद्धेमळे माणसाला मानसिक अपंगत्व येते.- दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे

सांगली:अंधश्रद्धा या ग्रामीण भागातील कुटुंबामध्ये वैरभाव निर्माण करत आहेत. अंधश्रद्धेमुळे माणसाला मानसिक अपंगत्व येते. याविषयावर मी ”पाम्प्लेट” नावाची फिल्म बनवली आहे. या अंधश्रद्धा दूर करण्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य लोकोपयोगी आहे असे प्रतिपादन दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी केले.

राष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी आज संजयनगर सांगली येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

यावेळी त्यांनी रेखा, पाम्प्लेट या त्यांच्या फिल्म निर्मिती मागची गोष्ट कार्यकर्त्यांना सांगितली. पाम्प्लेट या त्यांच्या फिल्ममध्ये त्यांनी अंधश्रद्धा हा विषय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी देव देवतांच्या नावाने मोफत पाम्प्लेट (पत्रके) वाटली जायची, संतोषी मातेच्या नावाने पोस्टकार्ड यायची. अशी १०० पत्रके वाटल्यानंतर तुम्हाला लाभ होईल, अपमान केल्यास वाईट होईल अशा स्वरूपाची ती पत्रके असायची. असेच एक देवाचे पाम्प्लेट एका मुलाच्या हातात पडते. त्यानंतर त्याची अंधश्रद्धेतून जी घालमेल होते याचे चित्रण त्यांनी ‘पाम्प्लेट’ या फिल्ममध्ये अतिशय उत्कृष्टपणे मांडले आहे. या फिल्मला अनेक देशी विदेशी पारितोषिके मिळालेली आहेत.

यावेळी दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचा सत्कार डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुस्तके देऊन करण्यात आ पणला. याप्रसंगी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, शहराध्यक्ष गीता ठाकर, राहुल थोरात, जगदीश काबरे, डॉ. सविता अक्कोळे, प्रा. अमित ठाकर, आशा धनाले, त्रिशला शहा, चंद्रकांत वंजाळे उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*