
ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त व्याख्यान,बहुजनांची सोनेरी पाने पुस्तकाचे प्रकाशन
सांगली :विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सर्व पुरोगामी संघटना, सांगली जिल्हा यांच्यावतीने पुरोगामी चळवळीतील जेष्ठ नेते दिवंगत ॲड.के.डी शिंदे स्मृती निमित्त शनिवार दि.३ मे रोजी नामांकित विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांचे ‘अभिव्यक्ती हक्कांचे सत्य’ विषयावरील व्याख्यान होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्याध्यक्ष कॉ.धनाजी गुरव यांनी दिली.
ते म्हणाले, ” जनता दल (सेक्युलर), विद्रोही सांस्कृतिक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हिंद मजदूर सभा हमाल पंचायत, मैलकुली, मस्टर असिस्टंट, अंगणवाडी सेविका, एसटी कामगार संघटना, जनरल मजदूर युनियन च्या माध्यमातून संघर्ष आणि प्रबोधन करणारे, शोषित, कष्टकऱ्यांचे वकील, प्रभावी वक्ते, उत्कृष्ट लेखक, पुरोगामी चळवळींचे मार्गदर्शक साथी म्हणून ॲड.के.डी शिंदे यांचे महत्वाचे योगदान आहे, नुकतेच त्यांचा प्रथम स्मृतिदिन झाला, त्यांनी अखंड आयुष्य कामगारांसाठी योगदान दिले, त्यामुळं कामगार दिनाच्या सप्ताहात त्यांच्या स्मृती निमित्त आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शनिवार दि.३ मे रोजी नामांकित विधिज्ञ ॲड.असीम सरोदे यांचे ‘अभिव्यक्ती हक्कांचे सत्य’ विषयावरील व्याख्यान, नगर वाचनालय, राजवाडा चौक, सांगली येथे दु ३ वा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला समाजातील परिवर्तनवादी विचारांच्या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी कॉ.गुरव यांनी यावेळी केले.
बहुजनांची सोनेरी पाने पुस्तकाचे प्रकाशन
याच वेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते ॲड.के.डी शिंदे लिखित बहुजनांची सोनेरी पाने पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात बहुजनांना दिशा देण्याचे काम केलेल्या महामानवांवर ॲड.के.डी शिंदे यांनी लेखन केले आहे, त्यांच्या पश्चात त्यांच्या ‘ बहुजनांची सोनेरी पाने ‘ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
Leave a Reply