सातारा राजद्रोहाचा खटला – १८५७
इंग्रज कंपनी सरकार विरुध्द सैन्याची जमवाजमव करणे , बंदुकीच्या गोळ्यांचे उत्पादनं करणे , ईस्ट इंडिया कंपनी सरकार विरोधी जनमानस भडकावणे , ईस्ट इंडिया कंपनी सरकारची ठिकाणे लुटणे थोरल्या प्रतापसिंह महाराजांची गादी पुन्हा स्थापित करणे व त्यांच्या दत्तक पुत्र याला गादिवर बसवणेचा प्रयत्न करणे या आरोपावरून १७ जणांविरोधी खटला भरला होता. हा कट रंगो बापुजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली रचला होता. या कटामध्ये सर्वसामान्य सामिल झाले होते. रामोशी, मातंग , शेणवी , कायस्थ प्रभु , सोनार , कुणबी आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या खटल्याची सुनावणी दि २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर १८५७ या कालावधीत तीन जणांच्या न्यायदान मंडळपूढे झाली. चार्लस फोर्ब्स यांचे अध्यक्षतेखालील या मंडळाचे कर्नल जी माल्कम व कॅप्टन जेम्स रोझ हे अन्य दोन सदस्य होते . या मंडळाचे पुढे या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर सातारा राजद्रोहाचा खटल्यात १७ जणांना दोषी ठरवण्यात आले. सर्वजणांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली व त्यांची सर्व संपत्ती सरकार जमा करण्यात आली.
विशेष म्हणजे या खटल्यात सरकारने १७ साक्षीदार तपासले .
देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी तीन प्रकारे करण्यात आली. ५ जणांना फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली.
६ जणांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारण्याची शिक्षा सुनावली तर ६ जणांना थोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा झाली .
या शिक्षेची अंमलबजावणी ८ सप्टेंबर १८५७ रोजी सातारा जवळील गेंडा माळ येथील फाशीचा वड येथे करण्यात आली.
देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये
१ ) नारायण ( नाना ) बापू पावसकर ( सोनार ) .
२) मुन्नाजी उर्फ बापू ( नारायण) बाबर ( भांदिर्गे )
३) केशव निळकंठ चित्रे ( रंगो बापूजी गुप्ते यांचे मेव्हणे )
४) शिवराम मोरेश्वर कुलकर्णी ( बहुश्रुत )
५) सखाराम बळवंत चव्हाण
६) रामजी बापूजी चव्हाण उर्फ रामसिंग
७) बाब्या रंगू ( कांगु ) शिरतोडे
८) बाब्या नाथ्या गायकवाड ( मांग )
९) येशा नाथ्या गायकवाड ( मांग )
१०) नाम्या नायकू चव्हाण
११) शिव्या सोमाजी पाटोळे
१२) पार्वती विठोजी ( गणेश ) साळोखा
१३) विठ्ठल कोंडी वाकनीस
१४) गणेश सखाराम कारखानीस
१५) पालटू येसू घाटगे
१६) सीताराम रंगराव गुप्ते ( रंगो बापूजी गुप्ते यांचे चिरंजीव )
१७) नाना उमाजी मुडके
यांचा समावेश आहे .
या हुतात्म्यांना देहदंडाची शिक्षा सुनावण्यात अली त्या घटनेला आज १६३ वर्षे झाली .
Leave a Reply