Taldev ZP Gat Election : तळदेव जिल्हा परिषद गट, कुंभरोशी पंचायत समिती गण, तळदेव पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत. महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 2 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 04 गण आहेत. तळदेव जिल्हा परिषद गट, भिलार जिल्हा परिषद गट हे दोन जिल्हा परिषद गट महाबळेश्वर तालुक्यात आहेत.
तळदेव हा राजकीय दृष्ट्या महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात कुंभरोशी गण आणि तळदेव गणांचा समावेश होतो. हा जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव जिल्हा परिषद गटाचा प्रवर्ग सर्वसाधारण आहे. तळदेव जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 34 आहे. या जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 20143 आहे. तर, कुंभरोशी पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 9640 इतकी आहे. तळदेव पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 10503 इतकी आहे.
तळदेव पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. तर, कुंभरोशी पंचायत समिती गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.
तळदेव पंचायत समिती गणातील गावे
विवर, सौदरी, सोमाट, कळमगांव, कळमगांव कळमकर, तळदेव, खांबील पोकळे, कुरोशी, कोट्रोशी, आमशी, खांबील चोरगे, लाखवड, हरचंदी, भिमनगर, वेंगळे, गोगवे, वारसोळी कोळी, वारसोळी देव, वेळापूर, रामेघर, पाली तर्फ आटेगांव, वानवली तर्फ सोळशी, वानवली तर्फे आटेगाव, तापोळा, खरोशी, रेणोशी, रुळे, गांवढोशी , आवळण, वाळणे, अहिर, मांढवली, दरे तर्फ गांव, पिंपरी तर्फ तांब
कुंभरोशी पंचायत समिती गणातील गावे
जावली, दरे, हारोशी, दुधोशी, मेटतळ,कुंभरोशी, रामआडवा गौड, सोंडपार,पेठपार, पारपार, कुमठे, बिरमणी , शिरव ली, कासरूड, हातलोट, बिरवाडी, मांघर, गोरीशी, घोणस पूर, चतुरबेट दुधगाव, झाजवड, दाभे मोहन , देवळी ,दाभेदाभेकर, शिरनार, कांदाट, झाडाणी, दोडाणी, सोळशी, उचाट, पर्वत तर्फ वाघावळे, लामज, वलवण, चकदेव, शिंदी, आरव, म्हाळुंगे निवळी, आकल्पे



Leave a Reply