Pusesawali ZP Gat Election Pusesawali Panchayat Samiti Gan Mhasurne Panchayat Samit Gan : पुसेसावळी जिल्हा परिषद गट, पुसेसावळी पंचायत समिती गण,म्हासुर्णे पंचायत समिती गण, गावांची नावं आणि मतदार संख्या
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम गण, गट रचना जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण 65 गट आहेत.साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांचे मिळूण 130 गण आहेत.
खटाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आहेत. तर, पंचायत समितीचे 14 गण आहेत. यामध्ये बुध गट,खटाव जिल्हा परिषद गट, कातरखटाव जिल्हा परिषद गट, निमसोड जिल्हा परिषद गट, औंध जिल्हा परिषद गट, पुसेसावळी जिल्हा परिषद गट, मायणी हे सात जिल्हा परिषद खटाव तालुक्यात आहेत.
पुसेसावळी हा राजकीय दृष्ट्या खटाव तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे. या गटात पुसेसावळी गण आणि म्हासुर्णे गणांचा समावेश होतो.पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचा अनुक्रमांक 22 आहे. पुसेसावळी जिल्हा परिषद गटाची मतदार संख्या 35460 आहे. तर,पुसेसावळी पंचायत समिती गणाची
मतदारसंख्या 17048 इतकी आहे. म्हासुर्णे पंचायत समिती गणाची मतदारसंख्या 18412 इतकी आहे.
पुसेसावळी जिल्हा परिषद गट आरक्षण : सर्वसाधारण महिला
पंचायत समिती सभापती प्रवर्ग : अनु. जाती महिला
पुसेसावळी (43) गणातील गावं (सर्वसाधारण )
वडी, कंळबी, गिरीजाशंकरवाडी, पुसेसावळी, थोरवेवाडी, लक्ष्मीनगर, उंचीठाणे, कातवडी पुनर्वसन, राजाचेकुर्ले, पारगाव, गोरेगाव (वांगी)
म्हासुर्णे (44) गणातील गावं (सर्वसाधारण महिला)
लाडेगाव, रेवली (पुर्न.), वांझोळी, मुसांडवाडी, होळीचागाव, भूषणगड, रहाटणी, कासारस्थळ (पुर्न.), वडगाव (ज.स्वा.), चोराडे, शेनवडी, पुनवडी (पुर्न.), कामटी तर्फ
परळी, म्हासुर्णे



Leave a Reply