SSC Mark Sheet : दहावीचे छापील गुणपत्रक कधी मिळणार? अपडेट समोर

पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. आता बोर्डाने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर दिनांक १३/०५/२०२५ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे.

त्याअनुषंगाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक २६/०५/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार असून माध्यमिक शाळांमार्फत त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचित करण्यात आलेले आहे.

याबाबत विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित मुख्याध्यापक आणि विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी, असं आवाहन बोर्डाने केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*