
सातारा दि. 26: शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सातारा येथे गोळीबार मैदान रोड गोडोली व सदर बझार मध्ये कनिष्क मंगल कार्यालयाच्या शेजारी, खटाव येथे तुळजाभवानी मंदिराच्या मागे, फलटण येथे विंचूर्णी रोड, जाधववाडीमध्ये येथे मुलींचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुकांनी मुलींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल व अधीक्षक यांनी केले आहे.
या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, खेळाचे साहित्य इत्यादी सोयी सुविधा शासनाकडून मोफत पुरवल्या जातात. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, खुला, अपंग, अनाथ प्रवर्गनिहाय प्रवेश प्रक्रीया राबविली जाते. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता वसतिगृहातील रिक्त जागेवर इयत्ता 8 वी पासून ते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रीया ऑफलाईन ऑनलाईन पध्दतीने सुरु असून विद्यार्थ्याकडून प्रवेश अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत.
Leave a Reply