23 ते 25 मे रोजी जी.डी.सी. ॲण्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा

23 ते 25 मे रोजी जी.डी.सी. ॲण्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा
सातारा दि. 21: राज्य शासनाच्या सहकार खात्यांतर्गत मे 2025 महिन्यात घेण्यात येणारी परिक्षा जी.डी.सी. ॲण्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा ही दिनांक 23, 24 व 25 मे 2025 रोजी सकाळी 10 ते 1 व दु. 2 ते 5 यावेळेत आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा (परीक्षार्थी क्रमांक 251207501 ते G251207623), धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा (G251207624 ते G251207983 व CHM-C251200188 ते C251200202), आणि महाराजा सयाजीराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पोवई नाका, सातारा (G251207984 ते G251208346) या तीन परिक्षा केंद्रावर घेणेत येणार आहे.
ज्या परिक्षार्थीना प्रवेशपत्र मिळालेले नाही. त्या परिक्षार्थीनी परीक्षेपुर्वी 1 तास अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर मागणीप्रमाणे उपलब्ध करुन दिले जातील. परीक्षा प्रवेशपत्र मिळणेसाठी परीक्षार्थींनी ओळखी दाखल पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड इत्यादी व आयकार्ड साईज दोन फोटो घेऊन यावेत, अशी माहिती संजयकुमार सुद्रिक जी.डी.सी. ॲण्ड ए. परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांनी कळविले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*