
हजरजबाबी , हमशकल – काळू- बाळू
सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ फक्कड यांनी लिहिलेला प्रेमाची फाशी हा वग सर्वप्रथम काळूबाळू चा पहिला वग म्हणून तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला. काळू बाळू दोघेही जुळे असल्यामुळे कोण काळू आणि कोण बाळू हे ओळखणे कठीण होई.