
SBI Clerk Mains Result 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया लवकरच क्लार्क म्हणजेच जुनियर असोसिएट मुख्य परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता ते स्टेट बँकेच्या sbi.co.in वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. स्टेट बँक क्लार्क परीक्षा 13735 जागांच्या भरतीसाठी घेण्यात आली आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 5870 जागा होत्या तर अनुसूचित जाती 2118, अनुसूचित जमाती 1385, ओबीसी 3001 आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी 1361जागा निश्चित होत्या. या भरती प्रक्रियेसाठी 17 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते.
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून क्लार्क मुख्य परीक्षेचा आयोजन 10 आणि 12 एप्रिल रोजी करण्यात आलं होतं. परीक्षेमध्ये एकूण 190 प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याला 200 गुण दिले जातील. परीक्षेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले असल्यास त्या प्रश्नासाठी गुण वाजा केले जाणार आहेत. स्टेट बँक क्लार्क पूर्व परीक्षेचे आयोजन 22, 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी करण्यात आले. स्टेट बँक क्लार्क पूर्व परीक्षेचा निकाल 28 मार्च 2025 ला जाहीर करण्यात आला होता.
स्टेट बँक क्लार्क मुख्य परीक्षा निकाल कसा पाहावा?
स्टेप 1- स्टेट बँक क्लार्क मुख्य परीक्षा निकाल 2025 पाहण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या
स्टेप 2- यानंतर करिअर सेक्शन वर क्लिक करा.
स्टेप 3- यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया क्लार्क मुख्य परीक्षा निकाल 2025 लिंक वर क्लिक करा.
स्टेप 4- नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सारखी माहिती भरा.
स्टेप 5- स्टेट बँक क्लार्क मुख्य परीक्षा निकाल तुमच्या पहायला मिळेल.
स्टेट बँक क्लार्क मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागेल. अर्ज करताना ज्या स्थानिक भाषेची निवड केलेली आहे, त्या भाषेची स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागेल. यातून ज्यांची निवड होईल त्यांना 17,900 रुपये – 47,920 रुपये, बेसिक पे 19,900 रुपयेनुसार वेतन मिळेल.
Leave a Reply