
RRB NTPC Exam City OUT, Direct Link: : आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल भरती परीक्षा शहरांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा शहर इंटीमेशन स्लीप आरआरबी च्या प्रादेशिक वेबसाईटवर पाहायला मिळेल. तिथून ते डाऊनलोड करता येईल. परीक्षा शहरासोबत प्रवास परवानगी आली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी चार दिवस प्रवेशपत्र जारी केले जाईल. एनटीपीसी सीबीटी परीक्षा 5 जून ते 24 जून दरम्यान होणार आहे. आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल भरती परीक्षा आता 16 दिवस चालणार आहे.
एनटीपीसी म्हणजेच नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी मध्ये पदवी लेवल साठी 8113 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यूजी लेव्हल साठी 3445 जागा आहेत. त्याच वेळापत्रक जाहीर झालेलं नाही. या पदांसाठी जवळपास 1.21 कोटीहून अधिक अर्ज आले आहेत.
RRB NTPC Exam City Direct Link
आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल पदे
गुड्स ट्रेन मॅनेजर नेजर- 3144 पदे
मुख्य वाणिज्य सह तिकीट पर्यवेक्षक- 1736 पदे
वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक- 732 पदे
स्टेशन मास्टर- 994 पदे
निवड प्रक्रिया
सर्व पदांसाठी दोन टप्प्यात सीबीटी परीक्षा होईल. सीबीटी परीक्षा 1,सीबीटी परीक्षा 2. होईल. यानंतर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट/टायपिंग स्किल टेस्ट होईल.
स्टेशन मास्टर पदासाठी कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट होईल.
सिनिअर क्लार्क कम टायपिस्ट, कनिष्ठ अकाउंट असिस्टंट कम टंकलेखक पदासाठी टायपिंग कौशल्य परीक्षा द्यावी लागेल.
गुड्स ट्रेन मॅनेजर आणि सिनिअर कमर्शियल कम तिकीट सुपरवायजर पदासाठी दोन टप्प्यात सीबीटी होईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी होईल.
सीबीटी मध्ये एक तृतीयांश नकारात्मक गुण असतील, जे चुकीच्या उत्तरासाठी वजा केले जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील सीबीटीसाठी उमेदवारांची निवड आरआरबी निहाय शॉर्टलिस्टिंग पदांच्या 15 पटीत जाईल.
परीक्षा पॅटर्न:
पहिल्या टप्प्यातील सीबीटी परीक्षा सर्वांसाठी असेल म्हणजेच ती सर्वांना द्यावी लागेल. सीबीटी परीक्षा 90 मिनिटांची असेल त्यामध्ये 100 प्रश्न असतील, 40 प्रश्न सामान्य ज्ञान ,30 प्रश्न गणित आणि 30 प्रश्न जनरल इंटेलिजन्स आणि रीजनिंगसाठी असतील. पहिल्या टप्प्यातील सीबीटी महत्त्वाची आहे कारण यातूनच सीबीटी क्रमांक 2 साठी उमेदवारांची निवड केली जाईल. त्यामध्ये 90 मिनिटांचा पेपर असेल तर 120 प्रश्न असतील यामध्ये सामान्य ज्ञान साठी 50 प्रश्न गणितासाठी 35 आणि जनरल इंटेलिजन्स आणि रीजनिंग साठी 35 प्रश्न असतील.
Leave a Reply