
ICAI CA Foundation Exam Dates: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटटस ऑफ इंडिया (ICAI) ने सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या CA फाउंडेशन, इंटरमीजिएट आणि फायनल या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा 3 सप्टेंबरला सुरु होतील तर 22 डिसेंबरला संपतील. परीक्षेसाठी नोंदणी जुलै महिन्यात सुरू होईल.
CA फाइनल परीक्षेच्या तारखा:
ग्रुप 1: 3, 6 आणि 8 सप्टेंबर 2025.
ग्रुप 2: 10, 12 आणि 14 सप्टेंबर 2025
CA इंटरमीजिएट परीक्षा तारखा:
ग्रुप 1 (पेपर): 4, 7 आणि 9 सप्टेंबर 2025
ग्रुप 2: 11, 13 आणि 15 सप्टेंबर 2025.
CA फाउंडेशन परीक्षा तारखा:
फाउंडेशन कोर्स परीक्षा 16, 18, 20 आणि 22 सप्टेंबर 2025 ला होईल.
परीक्षा वेळ आणि कालावधी
सर्व परीक्षा दुपारच्या शिफ्टमध्ये भारतीय प्रमाण वेळ नुसार 2 वाजता सुरु होतील.
फाउंडेशन पेपर 1 आणि 2: पेपर 3 तासांचे असतील, वेळ दुपारी 2 ते 5 पर्यंत असेल.
फाउंडेशन पेपर 3 आणि 4: पेपर 2 तासांचे असून 2 ते 4 या कालावधीत होतील. पेपर वाचनासाठी अतिरिक्त वेळ नसेल.
इंटरमीजिएट पेपर: सर्व पेपर दुपारी 2 ते 5 या वेळेत होतील विद्यार्थ्यांना पेपर वाचण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल. हा वेळ 1 वाचून 45 मिनिटांनी सुरू होईल.
फायनल कोर्स पेपर 1 ते 5: हा पेपर देखील तीन तासांचा असेल पेपर 2 ते 5 या कालावधीत होतील. या पेपर वाचनाच्या वेळेचा देखील समावेश असेल.
फायनल कोर्स पेपर 6: पेपर चार तासांचा असेल 2 ते 6 या कालावधीत सुरू असेल.
5 सप्टेंबर 2025 ला कोणतीही परीक्षा होणार नाही. कारण त्या दिवशी सरकारी सुट्टी मिलाद-उन-नबी निमित्तानं सुट्टी जाहीर केली जाते. परीक्षा ठरलेल्या तारखांना त्याच वेळी होतील. त्यात कोणताही बदल होणार नाही. पेपर मध्ये दोन भाग असतील तर MCQ वाला भाग दुपारी 2 नंतर उघडावा. विभागवार प्रश्न वाचनासाठी अधिक मिळणार नाही.
Leave a Reply