भारतीय राज्यघटनेनं आंदोलनाचं स्वातत्र्य दिलं, तिचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी : डॉ. भारत पाटणकर
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीनं करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देताना भारत पाटणकर यांनी मिरजमधून वैद्यकीय शिणाला सुरुवात केल्याचं सांगितलं. वयाच्या १८ व्या वर्षी पहिली चळवळ केल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. १९६४ मध्ये विद्यार्थी चळवळीत कामाला सुरुवात केली होती. स्वातंत्र्य लढ्यात कुटुंबीयांचा समावेश असल्यानं त्यांचा वारसा मिळाला यासोबत संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात प्र. के. अत्रे आणि कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या बैठकांना उपस्थित राहता आलं होतं. ते माझ्यासाठी अभ्यास मंडळाप्रमाणं होतं, असं भारत पाटणकर म्हणाले.
सध्या समाजात दु: ख आहे, तरुणांनी दु:खाच्या कारणांचा शोध घ्यावा. समाजाच्या चळवळी संपत चालले्या आहेत. तरुणांच्या चळवळी होत नाहीत, पर्यायी नाटकं संपत चाललेली आहेत. १९९० पर्यंच समाजाच्या चळवळी होत्या. समुदाय चळवळ नावाची गोष्ट केल्याशिवाय करमत नाही, असं देखील ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून एक व्यक्ती एक मत ही समता दिली. आता सामाजिक समता आणि आर्थिक समता येण्याचीगरज आहे. अलीकडच्या काळात पोलीस शांततेत होणाऱ्या आंदोलनाला देखील अडवतात. राज्य घटनेचं संरक्षण करणं आवश्यक असल्याचं डॉ. भारत पाटणकर म्हणाले.
Leave a Reply